Jogeshwari Fire : मुंबईच्या जोगेश्वरीतील JMS बिझनेस पार्क या उंच इमारतीला सकाळी 10:51 वाजता भीषण आग लागली. चार मजल्यांवर पसरलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. 

Jogeshwari Fire : मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा भागातील JMS बिझनेस पार्क या उंच इमारतीला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग एकाच इमारतीतील चार मजल्यांवर पसरली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

सकाळी साडेदहाच्या सुमारास लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 10:51 वाजता JMS बिझनेस पार्कमधील एका गाळ्यात अचानक आग लागली. काही क्षणांतच ही आग इमारतीच्या चार मजल्यांवर पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Scroll to load tweet…

जीवितहानी टळली, परंतु मोठे नुकसान

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस असल्याने आग झपाट्याने वाढली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर प्रतिसाद देत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

रहिवाशांची सुटका सुरू, मदतीसाठी हाका

इमारतीच्या वरच्या मजल्यांवर काही लोक अडकले असल्याची माहिती आहे. फायर ब्रिगेडचे जवान त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करत आहेत. ५ ते ६ लोक दहाव्या मजल्यावर अडकले असून, काही जणांना गुदमरल्याने किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्यांना ॲम्बुलन्समधून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील बिघाड हे कारण असू शकते. ओशिवरा पोलिस आणि अग्निशमन दल या दोन्ही विभागांकडून आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.

Scroll to load tweet…

 बीएमसीने घोषित केली लेव्हल-२ स्थिती

आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई अग्निशमन दलाने (MFB) या घटनेला लेव्हल-२ आग घोषित केले आहे. संपूर्ण परिसरात वाहतूक बंद करून सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे.