मुंबईतील भांडुपच्या कोकण नगर परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरात बुधवारी बेस्टच्या ई-बसचा भीषण अपघात झाला. कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बस अचानक अनियंत्रित झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीसह रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक बसली गेली. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय काही वाहनांचे मोठे नुकसानही झाले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

एकजण गंभीर जखमी

प्राथमिक माहितीनुसार, बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. यामध्ये रस्तावरील एका व्यक्तीलाही धडक बसली गेली. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमीला जवळील रुग्णालयात दाखल केले. अतुल पडाळे (वय 63) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. सध्या अतुल पडाळेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तीन दुचाकी आणि एका रिक्षेचे नुकसान

या दुर्घटनेत रस्त्यावर उभी असलेल्या तीन दुचाकी आणि एका रिक्षेचेही मोठे नुकसान झाले. बसच्या धडकेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यासोबत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.

पोलिस आणि बेस्ट प्रशासनाचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बेस्टचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण काय, बसवरील नियंत्रण कसे सुटले आणि त्यामागे तांत्रिक बिघाड होता की अन्य कारण, याचा तपास सुरू आहे.

दादरमधील अपघातानंतर पुन्हा बेस्ट बस चर्चेत

काही दिवसांपूर्वी दादरमधील प्लाझाजवळ बेस्ट बसच्या भीषण अपघात झाला होता. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. अशा बेस्टच्या अपघातानंतर ई-बसच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.