- Home
- Mumbai
- मुंबईत स्वतःचं हक्काचं दुकान घेण्याची सुवर्णसंधी कायम! म्हाडा गाळ्यांच्या ई-लिलावास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
मुंबईत स्वतःचं हक्काचं दुकान घेण्याची सुवर्णसंधी कायम! म्हाडा गाळ्यांच्या ई-लिलावास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
MHADA Shop Auction : मुंबई म्हाडा मंडळाने 84 अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ दिली. इच्छुक अर्जदार 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, तर ई-लिलाव 4 फेब्रुवारी 2026 ला होणारय. या लिलावात दुकाने इतर व्यावसायिक जागांचा समावेशय

मुंबईत स्वतःचं हक्काचं दुकान घेण्याची सुवर्णसंधी
मुंबई : मुंबईत स्वतःचं दुकान, ऑफिस किंवा व्यावसायिक जागा खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई म्हाडा मंडळाअंतर्गत येणाऱ्या 84 अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून याबाबतची अधिकृत माहिती म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता इच्छुक अर्जदारांना आता अर्ज करण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची नवी अंतिम तारीख
या ई-लिलावासाठी इच्छुक अर्जदारांना
2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत
ऑनलाइन नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
यापूर्वी अर्ज करण्याची मुदत संपणार होती. मात्र अर्जदारांची वाढती मागणी आणि प्रतिसाद पाहता म्हाडाने अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
4 फेब्रुवारी रोजी होणार ऑनलाइन ई-लिलाव
नोंदणी व अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी
दि. 4 फेब्रुवारी 2026
सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत
पूर्णपणे ऑनलाइन ई-लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. इच्छुक अर्जदारांना घरबसल्या या लिलावात सहभागी होता येणार आहे.
ई-लिलावासाठी अधिकृत वेबसाईट
हा ई-लिलाव म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर पार पडणार आहे.
www.eauction.mhada.gov.in
मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरात असलेले हे गाळे
दुकाने
कार्यालये
इतर व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त जागा
यांचा समावेश असलेले असल्याने व्यापारी, उद्योजक आणि गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इच्छुकांसाठी महत्त्वाची सूचना
ई-लिलावासंदर्भातील सविस्तर माहिती, अटी-शर्ती आणि अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुकांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे.

