MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • MHADA Mumbai Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या ११८ घरांसाठी 'आधी येणाऱ्यास प्राधान्य'; जाणून घ्या प्रक्रिया

MHADA Mumbai Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडाच्या ११८ घरांसाठी 'आधी येणाऱ्यास प्राधान्य'; जाणून घ्या प्रक्रिया

MHADA Mumbai Lottery: मुंबईत म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री सुरू केली. अर्जदारांना अर्ज केल्यावर ४८ तासांत घराच्या किमतीच्या १०% रक्कम भरणे अनिवार्य आहे. हा नियम न पाळल्यास भरलेली अनामत रक्कम जप्त केली जाईल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 04 2026, 04:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण!
Image Credit : Twitter

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण!

मुंबई: मुंबईसारख्या महानगरात स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने (MHADA) मोठी संधी आणली आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने शहरातील विविध भागांतील ११८ सदनिकांसाठी 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (First Come First Served - FCFS) या तत्त्वावर विक्री प्रक्रिया सुरू केली आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजेपासून या योजनेअंतर्गत अनामत रक्कमेसह अर्ज भरता येणार आहेत. मात्र, या प्रक्रियेत एक महत्त्वाचा नियम असून तो न पाळल्यास अर्जदारांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सावधान! १० टक्के रकमेची तरतूद असेल तरच अर्ज करा
Image Credit : Twitter

सावधान! १० टक्के रकमेची तरतूद असेल तरच अर्ज करा

म्हाडाने यावेळेस नियमावली कडक केली आहे. अर्जदाराने अनामत रक्कमेसह अर्ज भरल्यानंतर पुढील ४८ तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या १० टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे.

जर ही रक्कम वेळेत भरली नाही, तर घरावरील तुमचा दावा रद्द होईल.

इतकेच नाही, तर तुम्ही भरलेली १ ते ६ लाखांपर्यंतची अनामत रक्कम जप्त केली जाईल.

त्यामुळे खिशात पूर्ण तरतूद असेल तरच या प्रक्रियेत उतरावे, असे आवाहन म्हाडा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Related image1
BMC मेगा भरती 2026: मुंबई पालिकेत नोकरीचा महाकुंभ! 56,000 रिक्त पदे, 9,000 जागांसाठी प्रक्रिया सुसाट
Related image2
BMC Property Tax New Rules: मुंबईकरांना बीएमसीचं 'महा-गिफ्ट'! ७०० फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ; पालिकेत प्रस्ताव मंजूर
35
अनामत रक्कमेचे स्वरूप (Deposit Details)
Image Credit : Twitter

अनामत रक्कमेचे स्वरूप (Deposit Details)

घराच्या किमतीनुसार अनामत रक्कम खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

घराची किंमत,अनामत रक्कम (Deposit)

५० लाखांपर्यंत,१ लाख रुपये

५० लाख ते १ कोटी,२ लाख रुपये

१ कोटी ते २ कोटी,४ लाख रुपये

२ कोटींच्या पुढे,६ लाख रुपये

45
ही घरे रिक्त का राहिली?
Image Credit : Twitter

ही घरे रिक्त का राहिली?

मुंबईतील काही उच्च आणि मध्यम गटातील घरे त्यांच्या वाढीव किमतीमुळे, तर अल्प गटातील काही घरे गैरसोयीच्या ठिकाणी असल्यामुळे दोन-तीन वेळा सोडत काढूनही विकली गेली नव्हती. यामुळे म्हाडाचा मोठा महसूल अडकून पडला आहे. हा महसूल मोकळा करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी म्हाडाने प्रथमच मुंबईत FCFS तत्त्वावर ही विक्री सुरू केली आहे. 

55
अर्ज कसा करायचा?
Image Credit : our own

अर्ज कसा करायचा?

१. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा (नोंदणी प्रक्रिया अद्यापही सुरू आहे).

२. आपल्या पसंतीचे घर निवडा.

३. विहित अनामत रक्कम भरून अर्ज निश्चित करा.

४. पुढील ४८ तासांत १० टक्के रक्कम भरून आपला ताबा पक्का करा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Rain : मुंबईत पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट; काय आहे IMD चा अंदाज?
Recommended image2
Mumbai Monsoon Update : मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याकडून यलो अ‍ॅलर्ट जारी
Recommended image3
आमची जिरली, बाबाही गेले आणि दशम्याही गेल्या! ओमदादा तुमचं पेज आता उबाठाला
Recommended image4
Revati Sule Wedding: सुप्रिया सुळेंच्या लेकीचं लग्न, पण चर्चा सलमानच्या नव्या लुकची; बच्चन, कपूर, अंबानी कुटुंबाची हजेरी
Recommended image5
सुप्रिया सुळेंच्या मुलीला दिग्गजांनी लावली हजेरी; बॉलिवूड अभिनेते, राजकारणी आणि बिझनेसमेन सगळेच जातीने हजर
Related Stories
Recommended image1
BMC मेगा भरती 2026: मुंबई पालिकेत नोकरीचा महाकुंभ! 56,000 रिक्त पदे, 9,000 जागांसाठी प्रक्रिया सुसाट
Recommended image2
BMC Property Tax New Rules: मुंबईकरांना बीएमसीचं 'महा-गिफ्ट'! ७०० फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ; पालिकेत प्रस्ताव मंजूर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved