MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • MHADA Sathi: मुंबईत स्वतःचं घर घेण्याचा विचार करताय?, AI करणार झटपट मदत!; कसं ते जाणून घ्या

MHADA Sathi: मुंबईत स्वतःचं घर घेण्याचा विचार करताय?, AI करणार झटपट मदत!; कसं ते जाणून घ्या

MHADA Chatbot Assistant: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) नागरिकांच्या सोयीसाठी "म्हाडासाथी" नावाचा AI चॅटबॉट सुरू केला. हा चॅटबॉट घर खरेदी, लॉटरी, अर्ज प्रक्रिया, नियमावली विषयांवर मराठी आणि इंग्रजी भाषेत अचूक माहिती देतो. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 27 2025, 04:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
मुंबईत घर घेणं झालं आता अधिक सोपं
Image Credit : Asianet News

मुंबईत घर घेणं झालं आता अधिक सोपं

मुंबई: मुंबई महानगरात स्वतःचं घर असावं, हे लाखो लोकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अनेक वर्षांपासून घरे, प्लॉट्स आणि गाळे लॉटरी व ई-ऑक्शनद्वारे उपलब्ध करून देत आहे. मात्र, अर्ज प्रक्रिया, लॉटरीचे नियम, आवश्यक कागदपत्रं याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

या सर्व शंकांचं निरसन करण्यासाठी MHADA ने एक अभिनव पाऊल उचललं आहे. "म्हाडासाथी" नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित स्मार्ट चॅटबॉट नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात आला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
"म्हाडासाथी" म्हणजे काय?
Image Credit : social media

"म्हाडासाथी" म्हणजे काय?

MHADA ने सुरू केलेला हा AI चॅटबॉट नागरिकांना घर खरेदी, प्लॉट्स, गाळे, अर्ज प्रक्रिया, लॉटरी, नियमावली, निविदा आणि इतर अधिकृत माहिती झटपट आणि अचूक पद्धतीने पुरवणार आहे. 

Related Articles

Related image1
MHADA कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात! जाहीर झाला विक्रमी बोनस; पाहा, खात्यात किती रक्कम जमा होणार!
Related image2
MHADA House: म्हाडाचं घर घ्यायचंय? या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत, तर स्वप्नातील घर बनू शकतं त्रासदायक!
37
डिजिटल सेवांमध्ये आणखी एक पाऊल पुढे!
Image Credit : Getty

डिजिटल सेवांमध्ये आणखी एक पाऊल पुढे!

MHADA ने यापूर्वीच नागरिक सुविधा केंद्र, अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली आणि "डिजी-प्रवेश" यांसारख्या अनेक डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत. आता त्यात भर घालत 'म्हाडासाथी' या चॅटबॉटचे मुंबई MHADA मुख्यालयात लोकार्पण करण्यात आले. उपाध्यक्ष आणि CEO श्री. संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या सेवेला सुरुवात झाली. 

47
नागरिकांसाठी मिळणारे महत्त्वाचे फायदे
Image Credit : Getty

नागरिकांसाठी मिळणारे महत्त्वाचे फायदे

अचूक, विश्वासार्ह आणि तत्काळ माहिती

MHADA च्या वेबसाइटवर थेट सेवा

लवकरच मोबाईल अॅपद्वारेही सुविधा

कार्यालयात जाण्याची गरज नाही

वेळ वाचवणारी, घरबसल्या सेवा 

57
मराठीत आणि इंग्रजीत उपलब्ध सेवा
Image Credit : Getty

मराठीत आणि इंग्रजीत उपलब्ध सेवा

‘म्हाडासाथी’ चॅटबॉट मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये कार्यरत आहे. याशिवाय आवाजावर आधारित प्रणालीद्वारे नागरिक थेट आपले प्रश्न बोलून विचारू शकतात आणि लगेच उत्तरही मिळवू शकतात. 

67
या चॅटबॉटवर मिळणारी प्रमुख माहिती
Image Credit : Getty

या चॅटबॉटवर मिळणारी प्रमुख माहिती

म्हाडाच्या सर्व्हिसेस व कार्यपद्धती

लॉटरी आणि संगणकीय सोडतीची माहिती

अर्जाच्या सद्यस्थितीविषयी अपडेट

विविध गृहप्रकल्पांचे तपशील

नियमावली आणि नवीन धोरणं

निविदा आणि इतर अधिकृत सूचना 

77
सेवेत सातत्याने सुधारणा
Image Credit : Getty

सेवेत सातत्याने सुधारणा

MHADA ने नागरिक सुविधा केंद्रात प्रतीक्षा कालावधी फक्त 7-8 मिनिटांवर आणला आहे. लवकरच घरबसल्या कागदपत्र स्कॅन करून सबमिट करण्याची सुविधा देखील सुरू होणार आहे. MHADA च्या वेबसाईटवर 15 कोटीहून अधिक दस्तऐवज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, ज्यामुळे माहिती अधिकार अंतर्गत अर्जांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. 

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Dia Mirza Video Controversy : दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून राजकारण नाही, भाजप नेते अमित साटम यांचं स्पष्टीकरण
Recommended image2
Natasa Stankovic : नीता अंबानींच्या इव्हेंटमध्ये स्टार क्रिकेटरच्या एक्स-वाईफची एकच चर्चा
Recommended image3
Tukaram Mundhe : 'लोकांचा नायक' म्हणणाऱ्या हर्ष गोयंकांना तुकाराम मुंढेंनी दिलेलं उत्तर जिंकतंय मन
Recommended image4
Mumbai Weather Today: मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा, हवेची गुणवत्ता मात्र खराब
Recommended image5
Sanjay Raut : 'मोदींची अराजकीय भाषणं छान असतात, पण...'; संजय राऊतांचे दावे; नेमकं काय म्हणाले?
Related Stories
Recommended image1
MHADA कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात! जाहीर झाला विक्रमी बोनस; पाहा, खात्यात किती रक्कम जमा होणार!
Recommended image2
MHADA House: म्हाडाचं घर घ्यायचंय? या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत, तर स्वप्नातील घर बनू शकतं त्रासदायक!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved