MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • MHADA Lottery 2026 : म्हाडाची नवीन वर्षाची भेट! हजारो घरांची बंपर लॉटरी जाहीर; स्वस्तात घर मिळवण्यासाठी 'या' तारखेपूर्वी करा अर्ज!

MHADA Lottery 2026 : म्हाडाची नवीन वर्षाची भेट! हजारो घरांची बंपर लॉटरी जाहीर; स्वस्तात घर मिळवण्यासाठी 'या' तारखेपूर्वी करा अर्ज!

MHADA Lottery 2026 : म्हाडाचे कोकण मंडळ 2026 च्या सुरुवातीला 2 हजारांहून अधिक घरांची मोठी सोडत काढण्याच्या तयारीत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर याची अधिकृत घोषणा केली जाईल आणि फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये सोडत निघण्याची शक्यता आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Dec 25 2025, 09:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
नव्या वर्षात स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार?
Image Credit : Twitter

नव्या वर्षात स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार?

मुंबई : स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने 2026 च्या सुरुवातीला घरांची मोठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेर किंवा मार्च 2026 च्या सुरुवातीला सोडत जाहीर होऊ शकते. या प्रस्तावित लॉटरीत 2 हजारांहून अधिक घरांचा समावेश होण्याची शक्यता असून, नव्या वर्षात अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
आचारसंहिता संपल्यानंतरच अधिकृत घोषणा
Image Credit : Twitter

आचारसंहिता संपल्यानंतरच अधिकृत घोषणा

कोकण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, आचारसंहिता पूर्णपणे संपल्यानंतरच सोडतीची अधिकृत घोषणा केली जाईल. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सध्याच्या नियोजनानुसार फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला 2026 मध्ये लॉटरी काढली जाण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
Post Office: दरमहा 12500 रुपये वाचवा आणि 40 लाख रुपये मिळवा, ही योजना माहीत आहे?
Related image2
नवीन वर्षात घर घेताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास आयुष्यभराची पुंजी मातीमोल होईल!
36
2 हजारांपेक्षा जास्त घरांचा समावेश होणार?
Image Credit : Twitter

2 हजारांपेक्षा जास्त घरांचा समावेश होणार?

या सोडतीसाठी कोकण मंडळाकडून विविध गृहनिर्माण प्रकल्पांतील उपलब्ध घरांचा आढावा घेतला जात आहे. कोणती घरे लॉटरीत समाविष्ट करता येतील, याची तपासणी सुरू असून, यामध्ये 2 हजारांहून अधिक घरे येण्याची शक्यता आहे. 

46
काही योजनांना कमी प्रतिसाद; घरे रिक्त
Image Credit : Twitter

काही योजनांना कमी प्रतिसाद; घरे रिक्त

कोकण मंडळाच्या 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र मंडळाच्या इतर काही योजना तसेच पंतप्रधान आवास योजनेतील काही घरांकडे अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. घरांचे स्थान, किंमत आणि सोयीसुविधांमुळे ही घरे अद्याप रिक्त असल्याचे चित्र आहे.

56
‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेची विक्रीही रखडली
Image Credit : our own

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेची विक्रीही रखडली

मागील दोनपेक्षा अधिक सोडतींमध्ये न विकली गेलेली सुमारे 125 घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ (FCFS) योजनेअंतर्गत विक्रीस काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. दिवाळीत ही विक्री होणार होती; मात्र आवश्यक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही विक्रीही थांबली. आचारसंहिता संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. 

66
मुंबई मंडळाची सोडतही लांबणीवर
Image Credit : our own

मुंबई मंडळाची सोडतही लांबणीवर

दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2025 मध्ये घरांची सोडत काढण्याची घोषणा केली होती. मात्र मार्च–एप्रिलचा मुहूर्त हुकला आणि दिवाळीपर्यंतही लॉटरी निघाली नाही. त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने 2025 मध्ये सोडत काढणे शक्य झाले नाही.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मार्च 2026 मध्ये मुंबईतील घरांसाठी सोडत काढली जाईल, असे जरी जाहीर केले असले तरी प्रत्यक्ष तयारी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच पुढील हालचाली स्पष्ट होतील.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Recommended image2
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट
Recommended image3
Delhi Protest : दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले- 'ही तर अघोषित आणीबाणी!'
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Related Stories
Recommended image1
Post Office: दरमहा 12500 रुपये वाचवा आणि 40 लाख रुपये मिळवा, ही योजना माहीत आहे?
Recommended image2
नवीन वर्षात घर घेताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास आयुष्यभराची पुंजी मातीमोल होईल!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved