सार

येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

मुंबई : आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या अनेक काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांसह तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसेच जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

अवकाळी पावसासने शेती पिकांचे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. फळबागांसह भाजीपाला पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळं नांदेड, बारामती आणि नाशिकच्या सुरगाण्यात पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तिथं अवकाळीमुळे ज्वारी, केळी, आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे.