घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 35 जखमी, 100 जण अडकल्याची भीती

| Published : May 13 2024, 07:38 PM IST

Mumbai Ghatkopar hoarding accident
घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 35 जखमी, 100 जण अडकल्याची भीती
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

वेगवान वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळलं आहे. या दुर्घटनेमुळे 100 जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत आज अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. यावेळी प्रचंड वेगाने वारे वाहत होते. वेगवान वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळलं आहे. या दुर्घटनेमुळे 100 जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 35 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घाटकोपरच्या घटनेची उच्चस्तरिय चौकशीचे फडणवीसांचे आदेश

घाटकोरमध्ये घडलेल्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. “घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.