- Home
- Mumbai
- Maharashtra Cabinet Reshuffle : सह्याद्री अतिथिगृहावर गाठीभेटी वाढल्या, देवाभाऊंच्या मंत्रिमंडळातील या १० जणांना मिळणार डच्चू
Maharashtra Cabinet Reshuffle : सह्याद्री अतिथिगृहावर गाठीभेटी वाढल्या, देवाभाऊंच्या मंत्रिमंडळातील या १० जणांना मिळणार डच्चू
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या दरम्यान, एकनाथ शिंदे दिल्लीत तळ ठोकून आहेत. गुरुवारी सकाळी अजित पवार, तडकरे यांनी सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली.

दिल्ली दौर्यांवर भर
गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी मंत्रिमंडळातील फेरबदलांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिल्ली दौरा केला. बुधवारी रात्री फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यापूर्वीही शिंदे दिल्लीत असल्याचे वृत्त आहे.
रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले
रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याचे समजते. गोगावले यांच्या राजगडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गोगावलेंना धक्का दिला आहे. त्यांचे निकटवर्तीय पक्ष सोडून गेले आहेत. या शिवाय त्यांचा मंत्रिमंडळाचा कार्यकाळही प्रभावी राहिलेला नाही. यामुळे त्यांच्या पदावर टांगती तलवार असल्याचे दिसून येते.
धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कारभार होता. परंतु, संतोष देशमुख प्रकरणी आरोप झाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. त्यांच्याजागी छगन भुजबळ यांना स्थान मिळाले. आता पुन्हा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर जोरदार आरोप केले असून त्यांनीही याचे प्रत्युत्तर दिले आहे. महाजन यांच्यावर कामावर देवाभाऊ खुष नसल्याचे वृत्त आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
अजित दादा गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळाचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळत असल्याची सोशल मीडिया पोस्ट रोहित पवार यांनी केली होती. त्यानंतर त्यावर मोठी टीका झाली होती. यापूर्वी वादग्रस्त व्यक्तव्यांमुळेही ते चर्चेत आले होते.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असे कधी म्हटलेच नव्हते असा दावा केला होता. तेव्हा त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचे वृत्त आहे. यावर बोलताना त्यांनीही पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे म्हटले होते. खरी शिवसेना कोणाची, यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या भूमिकेवर बरेच प्रश्न उपस्थित केले होते.
माती व पाणी परिक्षण मंत्री संजय राठोड
माती व पाणी परिक्षण मंत्री संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यावरुन बरीच नाराजी होती. पुण्यात तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्यावर बरेच आरोप झाले होते. तरीही त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे कायम वादग्रस्त राहिले आहेत. त्यांचा नुकताच हॉटेलच्या रुममधील पैशांच्या बॅगसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार हे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू समजले जातात. त्यामुळे त्यांच्यावर देवाभाऊ नाराज होते. गेल्या वेळी झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात आयत्या वेळी त्यांचे नाव वगळण्यात आले होते. आता त्यांना विधानसभेचे अध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे.
तानाजी सावंत
तानाजी सावंत यांच्याकडे सामाजिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांना गेल्या वेळी डच्चू देण्यात आला होता. आता पुन्हा त्यांना संधी मिळू शकते. त्यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही वगळले जाण्याची शक्यता आहे. स्वारगेट बालात्कार प्रकरणी त्यांनी पीडितेच्या संदर्भात काही वक्तव्ये करुन सरकारला संकटात आणले होते. तसेच त्यांनी केलेली वक्तव्ये कायम चर्चेत राहिली आहेत.

