कोकण किनारपट्टीवर १५ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. १६ जुलै रोजी पावसाचा जोर कमी झाला असून, ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.

Konkan: कोकण किनारपट्टीवर हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील काही भागांत 15 जुलै रोजी दिवसभर मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. १६ जुलै रोजी पावसाने थोडी विश्रांती घेतली असून हवामान हे दमट आणि ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता 

काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये १५ जुलै रोजी पाऊस चांगला झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आज सकाळपासून वातावरणात बदल जाणवत असून, आकाश पूर्णतः ढगांनी व्यापले आहे. दुपारच्या वेळी पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठाणे आणि मुंबईला झाला मुसळधार पाऊस 

ठाणे आणि मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे काही भागांत पाणी तुंबल्याने रहदारीवर परिणाम झाला. आज वातावरणात दिलासा मिळाला असणं ढगाळ हवामान हवामान आणि थोड्याच सरी पडणार आहेत. काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी येऊ शकतात.

पालघरमध्ये ढगाळ वातावरण राहणार 

पालघर जिल्ह्यात आज, १६ जुलै रोजी दिवसभर हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले असून, काही भागांमध्ये हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दुपारी आणि संध्याकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमी असली, तरी वातावरण दमट आणि ढगाळ राहणार आहे. आजचे कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सियस आणि किमान तापमान २५ अंश सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात झाली अतिवृष्टी 

१५ जुलै रोजी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही भागांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. महाड, दापोली, देवगड आणि वेंगुर्ला या परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, आजचे वातावरण तुलनेत शांत असून आकाशात ढगाळ स्थिती आहे. सकाळपासून रिमझिम सरी सुरू असून, दुपारी व संध्याकाळच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या तापमान २८ ते २९ अंश सेल्सियसच्या दरम्यान असून, आर्द्रता लक्षणीय प्रमाणात वाढलेली आहे.