- Home
- Mumbai
- Karnavati Express Update : मुंबई सेंट्रल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; कर्णावती एक्स्प्रेसच्या टर्मिनसमध्ये तात्पुरता बदल
Karnavati Express Update : मुंबई सेंट्रल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; कर्णावती एक्स्प्रेसच्या टर्मिनसमध्ये तात्पुरता बदल
Karnavati Express Update : पश्चिम रेल्वेने तांत्रिक कामामुळे १२९३३/१२९३४ कर्णावती एक्स्प्रेसच्या स्थानकात तात्पुरता बदल केला आहे. २६ जानेवारी ते ७ मार्च २०२६ या काळात ही ट्रेन मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनसवरून सुटेल आणि तिथेच पोहोचेल.

मुंबई सेंट्रल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तांत्रिक कामकाजाच्या पार्श्वभूमीवर कर्णावती एक्स्प्रेसच्या सुरुवात आणि शेवटच्या स्थानकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रलवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
किती काळासाठी लागू राहणार बदल?
मुंबई सेंट्रल ते वटवा (अहमदाबाद) दरम्यान धावणारी 12933/12934 कर्णावती एक्स्प्रेस आता मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून धावणार आहे. हा बदल 26 जानेवारी ते 7 मार्च 2026 या कालावधीत लागू राहणार आहे.
कुठून सुटेल कर्णावती एक्स्प्रेस?
या कालावधीत कर्णावती एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल स्थानकावरून सुटणार नसून, थेट वांद्रे टर्मिनस येथून प्रवास सुरू करेल.
12933 कर्णावती एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथून दुपारी 1.55 वाजता रवाना होईल.
परतीच्या प्रवासात 12934 कर्णावती एक्स्प्रेस दुपारी 12.30 वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
प्रवाशांसाठी सूचना
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मुंबई सेंट्रल स्थानकावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना सुधारित वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून 7 मार्चनंतर कर्णावती एक्स्प्रेस पुन्हा मुंबई सेंट्रलवरून धावणार आहे.

