Mumbai Rain Forecast : कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट, मुंबईत ‘या’ महिन्यात कमी वेळात पडणार जास्त पाऊस

| Published : Jun 12 2024, 12:47 PM IST / Updated: Jun 12 2024, 12:48 PM IST

Mumbai Rain

सार

हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. इतकंच नाहीतर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.

 

मुंबईसह राज्यभरात नुकतीच पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस सर्वत्र पडला नाही तोवरच हवामान खात्यानं मुंबईकरांची चिंता वाढवणारी शक्यता वर्तविली आहे. हवामान बदलामुळे मुंबईमध्ये जुलै महिन्यात पावसाचे थैमान पाहायला मिळणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. इतकंच नाहीतर मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस कोसळणार असेही हवामान खात्याकडून सांगितले जात आहे. जुलै महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता असल्याची माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईकरांसाठी ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.

दुसरीकडे पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. कोकणासाठी आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट असून कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असणार असल्याचेही सांगितले जात आहे.

आणखी वाचा :

Petrol Diesel Price: पुणे आणि ठाण्यात पेट्रोल-डिझेल महागले?, तुमच्या शहरात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?