सार

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं सर्वत्र पाहायला मिळालं आहे. अशातच आज मुंबईमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईतील घोटकोपर येथे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं सर्वत्र पाहायला मिळालं आहे. अशातच आज मुंबईमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईतील घोटकोपर येथे एका पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या होर्डिंगखाली अनेकजण दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार १०० लोक अडकले आहेत. तर ३५ जण जखमी झाले आहेत. तर चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.

घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलीस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी उपचार करण्यात येत असून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.