MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • नवी मुंबईकरांसाठी 'गुड न्यूज'! साडेतीन हजार सोसायट्यांचा वनवास संपला; सिडकोचा ऐतिहासिक निर्णय

नवी मुंबईकरांसाठी 'गुड न्यूज'! साडेतीन हजार सोसायट्यांचा वनवास संपला; सिडकोचा ऐतिहासिक निर्णय

CIDCO building regularization policy: सिडकोने नवी मुंबई आणि पनवेलमधील सुमारे ३,५०० सोसायट्यांना मोठा दिलासा दिला आहे. बंगले आणि रो-हाऊससाठी दिलेल्या भूखंडांवर उभारलेल्या बहुनिवासी इमारतींना आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 31 2026, 06:23 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
नवी मुंबईकरांसाठी 'गुड न्यूज'! साडेतीन हजार सोसायट्यांचा वनवास संपला
Image Credit : Twitter

नवी मुंबईकरांसाठी 'गुड न्यूज'! साडेतीन हजार सोसायट्यांचा वनवास संपला

नवी मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून टांगती तलवार असलेल्या बहुनिवासी इमारतींच्या नियमितीकरणाचा प्रश्न सिडकोने अखेर निकाली काढला आहे. बंगले आणि रो-हाऊससाठी दिलेल्या भूखंडांवर उभारलेल्या इमारतींना आता 'कायदेशीर' मान्यता मिळणार असून, नवी मुंबई आणि पनवेलमधील सुमारे ३,५०० सोसायट्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय होता नेमका वाद?
Image Credit : Twitter

काय होता नेमका वाद?

सिडकोने सुरुवातीला नवी मुंबईत बंगले आणि रो-हाऊससाठी भूखंड दिले होते. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे तिथे बहुनिवासी इमारती उभ्या राहिल्या. नगरविकास विभागाने या बदलाला स्थगिती दिल्याने या इमारतींचे अस्तित्व तांत्रिकदृष्ट्या 'अवैध' ठरले होते. यामुळे घरांची खरेदी-विक्री, कर्ज मिळवणे आणि विशेषतः जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात मोठे अडथळे येत होते. 

Related Articles

Related image1
मुंबई महानगरपालिकेचा कारभार मेट्रो वुमनच्या हातात, आश्विनी भिडे यांची लवकरच आयुक्तपदी होणार निवड
Related image2
Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या २६४० घरांसाठी आजपासून अर्ज सुरू; नोंदणी करण्यापूर्वी 'या' कागदपत्रांची यादी तपासा!
35
कोणाला होणार फायदा?
Image Credit : Twitter

कोणाला होणार फायदा?

सिडकोच्या या निर्णयाचा लाभ प्रामुख्याने खालील भागांतील रहिवाशांना मिळेल.

पनवेल परिसर: नवीन पनवेल, पनवेल शहर, खांदा कॉलनी आणि खारघर (१,५०० हून अधिक प्रकल्प).

नवी मुंबई पट्टा: वाशी, नेरूळ, बेलापूर, जुईनगर, कोपरखैरणे आणि तुर्भे (सुमारे २,००० रो-हाऊस/सोसायट्या). 

45
निर्णयाचे ३ मोठे फायदे
Image Credit : Twitter

निर्णयाचे ३ मोठे फायदे

१. पुनर्विकासाचा मार्ग मोकळा: मोडकळीस आलेल्या इमारतींना आता कायदेशीररीत्या पुनर्विकासासाठी जाता येईल.

२. मालकी हक्कावर शिक्कामोर्तब: मालमत्ता हस्तांतरणातील अडथळे दूर झाल्याने घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सोपे होतील.

३. बँक कर्ज सुलभ: इमारती नियमित झाल्यामुळे रहिवाशांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात आता कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.

“हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून हजारो कुटुंबांच्या हक्कांशी संबंधित आहे. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेला कायदेशीर संरक्षण मिळाले असून प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत.” - प्रशांत ठाकूर

55
बैठकीत काय झाले?
Image Credit : our own

बैठकीत काय झाले?

१२ मार्च रोजी झालेल्या सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या धोरणात्मक निर्णयावर मोहोर उमटवण्यात आली. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती आणि रहिवाशांची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने हा सकारात्मक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे आता सिडको क्षेत्रातील रखडलेल्या घरांच्या प्रकल्पांना मोठी गती मिळणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Recommended image2
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज
Recommended image3
Vidhan Parishad | महायुतीचे 6 बिनविरोध, नाशिक-जळगावात बंडखोरी
Recommended image4
TUKARAM MUNDHE | पण साहेब या भेसळखोरांची तक्रार करायची तरी कुठे, पाहा हा पर्याय
Recommended image5
Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये भाजीपाल्याची विक्री; व्हायरल व्हिडीओनंतर रेल्वे प्रशासनावर प्रश्न (Watch Video)
Related Stories
Recommended image1
मुंबई महानगरपालिकेचा कारभार मेट्रो वुमनच्या हातात, आश्विनी भिडे यांची लवकरच आयुक्तपदी होणार निवड
Recommended image2
Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या २६४० घरांसाठी आजपासून अर्ज सुरू; नोंदणी करण्यापूर्वी 'या' कागदपत्रांची यादी तपासा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved