BJP MLA Gopichand Padalkar : हिंदू मुलींनी अशा जिमध्ये जाऊ नये, जिथे ट्रेनर कोण आहे हे माहीत नाही, ही माझी नम्र विनंती आहे. हा किती मोठा कट आहे, हे तुम्हाला माहीत नाही. घरीच योगा किंवा व्यायाम करणे चांगले आहे.

BJP MLA Gopichand Padalkar : कॉलेजला जाणाऱ्या हिंदू मुलींनी जिमला जाणे टाळावे. जिमला जाण्याऐवजी त्यांनी घरीच योगा किंवा व्यायाम करावा, असा सल्ला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात एका सभेला संबोधित करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ''जिममध्ये एक मोठा कट रचला जात आहे. तिथे हिंदू मुलींना आकर्षित केले जात आहे. हा एका गंभीर कटाचा भाग आहे.

हिंदू मुलींनी अशा जिमध्ये जाऊ नये, जिथे ट्रेनर कोण आहे हे माहीत नाही, ही माझी नम्र विनंती आहे. हा किती मोठा कट आहे, हे तुम्हाला माहीत नाही. घरीच योगा किंवा व्यायाम करणे चांगले आहे. जिमला जाण्याची गरज नाही. कॉलेजमध्ये येणाऱ्या तरुणांची ओळख तपासली पाहिजे.

ज्यांची ओळख स्पष्ट नाही, त्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण एक मजबूत प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार केली पाहिजे,'' अशी विनंती त्यांनी केली.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. पडळकरांचे भाषण जातीयवादी आणि महिलांच्या स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली विशिष्ट समाजाला लक्ष्य करणे अन्यायकारक असल्याचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही भाजप नेत्यांनी पडळकरांचे भाषण पक्षाची अधिकृत भूमिका नसून, पक्षाच्या धोरणांशी विसंगत असलेले वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.