Arif Bhaijaan Passess away: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या मेहुण्याचा मृत्यू, आर्थर रोड तुरुंगात भोगत होता शिक्षा

| Published : Jun 22 2024, 01:10 PM IST / Updated: Jun 22 2024, 01:19 PM IST

arif bhaijaan

सार

Arif Bhaijaan Passess away : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

Arif Bhaijaan Passess away : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना आरिफच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. पोलिसांनी तातडीनं त्याला उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.

गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याचा सहकारी छोटा शकील यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. एनआयएने दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात आरिफ भाईजानला अटक केली होती. आरिफ हा आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने मे 2022 ला आरिफला अटक केली होती.