राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी आनंदी आहेत. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, १० जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होतील आणि पाऊस टप्प्याटप्प्याने पडेल. त्यांनी जुलै महिन्यात २ ते २० तारखेदरम्यान चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, तसेच २५ ते ३० जून दरम्यान सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज दिला आहे.
राज्यात हवामान बदलत असल्याचं दोन, तीन दिवसांपासून दिसून आलं आहे. पावसाचं आगमन झालं असून शेतकरी राजा आनंदी झाला आहे. आता पेरणीला सुरुवात होईल आणि ग्रामीण भागात सगळीकडं हिरवळ दिसून येईल. पंजाबराव डख यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला असून त्यांनी काय म्हटलंय तेच आपण जाणून घेणार आहोत.

पेरण्या कधीपर्यंत होणार पूर्ण -
पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार १० जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होणार आहेत. शेतकऱ्यांनी सुरुवातीला पाऊस झाला नाही म्हणून घाबरून जाऊ नये. पाऊस हा टप्याटप्यातच पडणार आहे. जुलै महिन्यात १० जुलै ते १५ जुलैच्या दरम्यान पाऊस होणार आहे. २५ ते ३० जून या तारखेच्या दरम्यान सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात पाऊस पडणार आहे.
यंदा धरणाला किती पाणी येणार?
यंदा धरणाला किती पाणी येणार याबाबतची माहिती दिली आहे. तुमच्या भागात आज पाऊस झालेला असेल तर लगेच दोन दिवसांनी तुमच्याकडे पाऊस येणार आहे. मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होणार आहे. कोकणातही या काळात पाऊस होणार आहे. २ जुलै ते २० जुलैच्या कालावधीत चांगला पाऊस होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
