सार

नांदेड, लातूरसह मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ६ जूनपर्यंत या जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Marathwada Rain update: राज्यात उन्हाचा चटका वाढला असून उकाड्याने घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज २ जूनला नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना व धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, ३ ते ६ जून दरम्यान बीड, नांदेड,लातूर व धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.