विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये ₹37 कोटींपेक्षा जास्त किमतीची 5 एकर जमीन खरेदी केली आहे. ही त्यांची या भागातील दुसरी मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक असून, मुंबईजवळील हे ठिकाण सेलिब्रिटींमध्ये गुंतवणुकीसाठी लोकप्रिय ठरत आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये पुन्हा एकदा मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. या दाम्पत्याने अलिबाग परिसरात ₹37 कोटींपेक्षा अधिक किमतीची जमीन खरेदी केली असून, ही त्यांची या भागातील दुसरी जमीन खरेदी असल्याची माहिती समोर आली आहे.
किती जमीन घेतली?
मिळालेल्या माहितीनुसार, विराट-अनुष्काने सुमारे 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळाची जमीन विकत घेतली आहे. ही जमीन अलिबागजवळील निसर्गरम्य परिसरात असून, मुंबईपासून जवळ आणि शांत वातावरणामुळे हा भाग सेलिब्रिटींमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे.
या व्यवहारासाठी या जोडप्याने लाखो रुपयांची स्टँप ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरले आहे. अधिकृत कागदपत्रांनुसार, ही खरेदी नुकतीच नोंदवण्यात आली असून, रिअल इस्टेट क्षेत्रातील ही एक मोठी गुंतवणूक मानली जात आहे. याआधीही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी करून तेथे आलिशान फार्महाऊस उभारण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे अलिबाग हे त्यांच्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक बनत चालल्याचे चित्र दिसत आहे.
अलिबागला केली अनेकांनी गुंतवणूक
मुंबईजवळील अलिबाग हे ठिकाण सध्या अनेक उद्योगपती, अभिनेता-अभिनेत्री आणि खेळाडूंसाठी गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे. विराट-अनुष्काच्या या नव्या गुंतवणुकीमुळे अलिबागमधील रिअल इस्टेट बाजारपेठेला आणखी चालना मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


