MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल! ४९ लाख कुटुंबांच्या जमिनी होणार कायदेशीर, जाणून घ्या सरकारचा ऐतिहासिक निर्णय

तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल! ४९ लाख कुटुंबांच्या जमिनी होणार कायदेशीर, जाणून घ्या सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Tukdebandi Act Maharashtra Change: महाराष्ट्र सरकारने नागरी, प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या अध्यादेशामुळे १९६५ पासून अडकलेले लाखो जमीन व्यवहार आता शुल्क न आकारता नियमित होणार आहेत. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Nov 05 2025, 11:15 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल!
Image Credit : social media

तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल!

मुंबई: राज्यातील नागरिकांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल करत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नागरी आणि प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापराच्या जमिनींसाठी लागू असलेला तुकडेबंदी कायदा आता रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे १९६५ पासून अडकलेले लाखो जमीन व्यवहार अखेर कायदेशीर ठरणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या अध्यादेशाची सविस्तर माहिती दिली असून, सरकारचा हा निर्णय लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक अध्यादेश
Image Credit : unsplash

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक अध्यादेश

महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्यांचे एकत्रीकरण अधिनियम’ (Fragmentation Act) मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश ३ नोव्हेंबर २०२५ रोजी मंजूर केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मते, या सुधारित अध्यादेशामुळे सुमारे ४९ लाख कुटुंबे आणि दोन कोटी नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. दीर्घकाळापासून अडकलेले जमीन व्यवहार, मालकी नोंदी आणि विकास प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. 

Related Articles

Related image1
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही 21वा हप्ता! पाहा, तुमचं नावही आहे का यादीत?
Related image2
मोठी खुशखबर! आता महाराष्ट्रात मिळणार मोफत वीज; “पहले आओ, पहले पाओ” तत्त्वावर सुरू होणार स्मार्ट योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती!
36
१९६५ पासून अडकलेले व्यवहार आता होणार नियमित
Image Credit : social media

१९६५ पासून अडकलेले व्यवहार आता होणार नियमित

अध्यादेशानुसार, १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत झालेल्या तुकड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांना आता कोणतेही शुल्क न आकारता नियमित करण्यात येईल. यामुळे नोंदणी झालेल्या पण ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदले न गेलेले नागरिक आता अधिकृत मालक म्हणून नोंदवले जातील. तसेच, फक्त नोटरीद्वारे झालेले व्यवहार असणाऱ्यांना सब-रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन नोंदणी करून आपले हक्क कायदेशीररीत्या मिळवता येतील, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

46
तुकडेबंदी कायद्याची पार्श्वभूमी
Image Credit : Social Media

तुकडेबंदी कायद्याची पार्श्वभूमी

हा कायदा मूळतः शेती क्षेत्रातील जमिनींचे अतिविभाजन रोखण्यासाठी लागू करण्यात आला होता.

बागायत आणि जिरायत जमिनींसाठी ठराविक क्षेत्रमर्यादा ठेवून उत्पादकता टिकवणे हा उद्देश होता.

परंतु, वाढत्या नागरीकरणामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी लहान जागा विकत घेऊन घरे वसवली आणि व्यवहार केले.

या सर्वांना तुकडेबंदी कायद्यामुळे कायदेशीर मान्यता मिळू शकत नव्हती.

राज्य सरकारने अखेर या वास्तवाचा विचार करून नागरी भागांसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

56
कोणत्या भागांना मिळणार या निर्णयाचा लाभ?
Image Credit : Getty

कोणत्या भागांना मिळणार या निर्णयाचा लाभ?

हा निर्णय खालील नागरी आणि नियोजन क्षेत्रांमध्ये लागू होणार आहे.

महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रे

मुंबई, पुणे, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांची क्षेत्रे (MMRDA, PMRDA, NMRDA)

इतर ग्रोथ सेंटर्स आणि विशेष नियोजन प्राधिकरणे

युडीसीपीआर (UDCPR) अंतर्गत येणाऱ्या शहर आणि गावांच्या परिघातील सर्व क्षेत्रे 

66
राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक पाऊल
Image Credit : social media

राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक पाऊल

या निर्णयामुळे अनेक दशकांपासून कायदेशीर अडचणीत अडकलेल्या जमिनी, घरे आणि प्लॉट्सना कायदेशीर मान्यता मिळेल. राज्य सरकारचा हा निर्णय केवळ प्रशासनिक बदल नसून, तो नागरिकांच्या मालकी हक्काच्या स्वप्नाला वास्तवात आणणारा ठरणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Board Supplementary Exam 2026 : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 16 जूनपासून परीक्षांना होणार सुरुवात
Recommended image2
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; RCC संस्थापकाला CBI कडून अटक, लातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
Recommended image3
उद्धव ठाकरेंचा हा खासदार शिंदे गटाला मिळणार, नाव ऐकून म्हणाल हे कस झालं?
Recommended image4
बैल कापला तर आम्ही, संग्राम जगताप यांनी दिला मोठा इशारा
Recommended image5
ST Bus Fare Hike : डिझेल दरवाढीचा ST महामंडळाला फटका; बसभाडे वाढीचे संकेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य
Related Stories
Recommended image1
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही 21वा हप्ता! पाहा, तुमचं नावही आहे का यादीत?
Recommended image2
मोठी खुशखबर! आता महाराष्ट्रात मिळणार मोफत वीज; “पहले आओ, पहले पाओ” तत्त्वावर सुरू होणार स्मार्ट योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved