सार
पुणे आणि परिसरात पावसामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचा विसर्ग दुप्पट पटीने वाढवला जाईल. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात पाऊस पडून काही दिवस पूर्ण होत नाही तोच परत एकदा येथे पावसाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी पाऊस वाढल्यामुळे परत एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे आणि परिसरात कालपासून जोरात पाऊस पडत असून त्यामुळे परत एकदा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो. यामुळे या धरणाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत दुप्पट पटीने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवणे नांदेड सिटीचा पूल गेला पाण्याखाली -
नदीतून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे शिवणे नांदेड सिटी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस वाढत असल्यामुळे येथील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता पानशेत धरणाच्या सांडव्यावरून 6 हजार ६८३ क्युसेक आणि विद्युत गृहद्वारे ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
नागरिकांना सावध राहण्याचे केले आवाहन -
नागरिकांना सावध राहण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले आहे. पाणी नदीपात्रात कमी जास्त स्वरूपात येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये अशी सूचना करण्यात आली आहे. नदीपात्रात काही जनावरे किंवा साहित्य असेल तर ताबोडतोब हलवावे असे सांगण्यात आले आहे.