सोलापूर-विजापूर बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान अशी मृत तरुणांची नावे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Solapur Accident : सोलापूर शहरातून भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर-बिजापूर रोड बायपास रोडवर भरधाव कारने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून वाहन अक्षरशः चक्काचूर झाले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रोजा इफ्तारनंतर बाहेर पडले होते

मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च रोजी संध्याकाळी रोजा इफ्तार केल्यानंतर इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान हे दोघे तरुण चहा पिण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री सुमारे 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली.

दोघांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महापालिका रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून तरुणांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.