साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सव सुरू, भक्तांसाठी साईमंदिर रात्रभर खुलं राहणार

| Published : Jul 20 2024, 04:07 PM IST / Updated: Jul 20 2024, 04:22 PM IST

Only 12 thousand devotees will be able to see Shirdi Sai Baba daily, pre-booking will have to be done online.
साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सव सुरू, भक्तांसाठी साईमंदिर रात्रभर खुलं राहणार
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Guru Purnima 2024 : शिर्डीत साईबाबा उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. या निमित्ताने देश विदेशातील लाखो भाविक शिर्डीत उपस्थित झाले आहेत.

दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. या निमित्ताने शनिवारपासून तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. शनिवारी गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.

गुरुपौर्णिमा उत्सव शनिवारपासून सुरू

साईबाबा संस्थानच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास शनिवारी पहाटे प्रारंभ झाला असून पहाटे काकड आरती मंगलस्थानानंतर साई चरित्राची ग्रंथ मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली. साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

उत्सवाचा पहिला दिवस

उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी शनिवार दिनांक २० जुलै पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता श्रींचे फोटो आणि पोथीची मिरवणूक, ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्चरित्राचे अखंड पारायण, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत पद्मश्री मदन चव्‍हाण यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत भुवनेश नैथानी, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत ह.भ.प.श्री मंदार व्‍यास, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम, सायंकाळी ०७.०० वा. श्रींची धुपारती, ७.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत श्री प्रशांत भालेकर, मुंबई यांचा स्‍वरधुनी साईगीतांचा कार्यक्रम, रात्री ०९.१५ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार आहे. पालखी मिरवणूक परत आल्यानंतर रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. या दिवशी पारायाणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडं राहील.

उत्सवाचा मुख्य दिवस

उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रविवार दिनांक २१ जुलै रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत श्री नाना वीर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत संजीव कुमार, पुणे यांचा भजनसंध्‍या कार्यक्रम, सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.श्री संतोष पित्रे, डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धूपारती होईल. ७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत श्री नीरज शर्मा, दिल्‍ली यांचा भजनसंध्‍याचा कार्यक्रम, रात्री ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक २२ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही. या दिवशी रात्री १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल.

उत्सवाची सांगता

उत्सवाच्या सांगता दिनी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. सकाळी १०.०० ते १२.०० वाजता या वेळेत ह.भ.प.श्री वैभव ओक, डोंबिवली यांचा गोपालकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्‍यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्रीमती वनिता बजाज, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०४.०० ते ०६.०० या वेळेत श्री विरेंद्रकुमार, साई ब्रदर्स, प्रयागराज यांचा मनोहारी भक्‍तीमय भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्री ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री ग्‍यानेश वर्मा, मुंबई यांचा साईराम गुणगान कार्यक्रम होईल. रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.

राज्यासह देशभरातून भाविक साईनगरी दाखल

शनिवारी उत्सवाचा पहिला दिवस असून साईसच्चरित ग्रंथाच्या मिरवणुकीत संस्थांनचे अध्यक्ष सुधाकर येरलगड्डा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि आणि संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर सहभागी झाले होते. रविवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून भक्तांसाठी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक पायी पालखी देखील आता शिर्डीत पोहोचायला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

आणखी वाचा :

288 जागांची तयारी ठेवा, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे पाचवे उपोषण सुरू