सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत नवीन उमेदवारांची यादी भाजपाकडून जाहीर करण्यात आली आहे. पहिली जाहीर केलेल्या यादीवरून कार्यकर्त्यांची भांडण झाली होती. 

२. आज साजऱ्या होणाऱ्या गोपाळकाला हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून जखमी गोविंदांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे ठेवण्यात आले आहेत. 

३. दहीहंडी कार्यक्रमासाठी मुंबईमध्ये गोविंदांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंड्या भरवल्या असून सेलिब्रेटींना बोलावले आहे. 

४. महाविकास आघाडीचे मुंबईतील अजूनही जागावाटप झाले नाही. लवकरच तो निर्णय होईल असं नेत्यांनी सांगितलं आहे. 

५. भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील दहीहंडी फोडली आहे.