रविवार, १५ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

| Published : Sep 15 2024, 08:22 AM IST / Updated: Sep 15 2024, 09:05 PM IST

thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर १५ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

1. दोनच दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, कोर्टात जामीन मंजूर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. माझ्या पत्नीला तुम्ही मुख्यमंत्री करा, हे आमदारांना पटवून द्यायचं आहे, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला, अशी भाजपाने टीका केली आहे.

2. मला विरोधी पक्षातील नेत्याने पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, नितीन गडकरी यांनी गौप्यस्फोट केला आहे. नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज, ते पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल, अशी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

3. मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही, संभाजीनगर दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; नरेंद्र मोदी- न्या. चंद्रचूड भेटीवर ठाकरे यांनी टीका केली आहे.

4. दोन गटांमधील मारहाणीत कर्नाटकमध्ये गणपतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेबद्दल काँग्रेस सरकारवर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. 

5. भाषण करत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना आवाज कमी करण्याचा आदेश दिला. 

6. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बारामतीमध्ये बॅनर झळकले आहेत. 

7. गणेशोत्सवात लोकलच्या २२ ज्यादा फेऱ्या सोडण्यात आले आहेत.