सार
सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याचं दिसून आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथून त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे? -
आज सुरु असलेला जातीयवाद याआधी कधीही महाराष्ट्रात पाहिला नव्हता. फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरु केलं. पण आज पक्ष आणि चिन्हच ढापले जात आहेत. शिवसेना ही शिंदे किंवा उद्धव ठाकरेंची नाहीये तर ती बाळासाहेबांची आहे. तसेच राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
सगळ्या राजकारण्यांनी शहरांची, जिल्ह्यांची बजबजपुरी केली -
‘सगळ्या राजकारण्यांनी शहरांची, जिल्ह्यांची बजबजपुरी केलीये. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी महापालिका. किती महापालिका. ही माणसं आली कुठून. पाकिस्तान, बांग्लादेशातून आलेले लोकं कुठे राहत आहेत. ती कोण आहेत, ती आलू कुठून. कोणाचं लक्षच नाही याच्याकडे. मुंब्रा काय उगच वाढतंय का. काय होईल फार फार तर मतदार मरतील. पण राजकारण्यांना वेळ नाही. मतदानासाठी फक्त जीवंत राहा दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. नंतर मग फोडाफोडी. तुम्ही दिलेले मत आता सध्या कुठे फिरतंय. माझं मत कुणाकडे आहे.’