Shivrajyabhishek 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराजांना वंदन करण्यासाठी लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर

| Published : Jun 06 2024, 11:03 AM IST

shivrajyabhishek

सार

Shivrajyabhishek 2024 : यंदा शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.

 

संपूर्ण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. छत्रपती शिवरायांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय. महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवभक्त या ठिकाणी महाराजांना वदन करण्यासाठी रायगडावर जमा झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 350 वं वर्ष आहे. त्यामुळे रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आजच्या दिवसातला हा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलीय.

किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. ढोलताशांच्या गजरात शककर्ते शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे. अनेक शाहीर कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. एकूणच किल्ले रायगडावर वातावरण अगदी शिवमय झालं आहे. या सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी करण्यात आली आहे. एकूण 39 समित्या गडावर तयारीसाठी दाखल झाल्या आहेत. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येत असतात. त्यानिमित्ताने पोलीस प्रशाननाकडूनही संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय.