MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Shetkari Karjmafi 2026: बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; खात्यात जमा होणार 'इतके' लाख, पाहा संपूर्ण अपडेट

Shetkari Karjmafi 2026: बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; खात्यात जमा होणार 'इतके' लाख, पाहा संपूर्ण अपडेट

Shetkari Karjmafi 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी' योजनेला वेग आला. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत कर्ज असलेल्या २५ लाख शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 31 2026, 07:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा
Image Credit : Getty

बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी’ योजनेच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीचा (SLBC) सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकरच राज्यातील सुमारे २४ लाख ७३ हजार ५६६ थकबाकीदार शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील ओझं कमी होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
२ लाखांपर्यंतची कर्जमाफी: कोणाला मिळणार लाभ?
Image Credit : Asianet News

२ लाखांपर्यंतची कर्जमाफी: कोणाला मिळणार लाभ?

राज्य सरकारने या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. सहकार विभागाने बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, राज्यातील १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २४.७३ लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे एकूण ३५,४७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. 

Related Articles

Related image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Related image2
शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! पशुपालन व्यवसायासाठी सरकार देतंय ३० लाखांपर्यंत मदत; 'असा' घ्या या योजनेचा लाभ
35
'या' तारखेपर्यंतची थकबाकी होणार माफ
Image Credit : iSTOCK

'या' तारखेपर्यंतची थकबाकी होणार माफ

योजनेचे निकष अत्यंत स्पष्ट आहेत.

मुदत: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

कर्जाचा प्रकार: केवळ पीक कर्जच नव्हे, तर शेतीसाठी घेतलेली मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जेही या माफीच्या कक्षेत येणार आहेत.

थेट लाभ: पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. 

45
या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा
Image Credit : iSTOCK

या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा

बँकर्स समितीच्या अहवालानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थकबाकीदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि अहिल्यानगर यांसह एकूण १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा आधार मिळणार आहे. 

55
प्रक्रिया कधी सुरू होणार?
Image Credit : iSTOCK

प्रक्रिया कधी सुरू होणार?

पीक कर्जाच्या परतफेडीची मुदत साधारणतः ३० जूनपर्यंत असते. त्यापूर्वीच कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे. सहकार विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांतच योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल. 

"ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नियमित आहे, पण इतर शेती कर्जे थकीत आहेत, अशांनाही या योजनेत सामावून घेतल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे."

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Teacher Assault : क्लासमध्ये उभं का केलं? बापाची कॉलेजमध्ये घुसून शिक्षकाला मारहाण; बीडमधील घटनेचं CCTV व्हायरल
Recommended image2
Nepal Floods : नेपाळमधील प्रलयातून नागपूरचे पर्यटक सुखरूप परतले, सांगितला थरारक अनुभव
Recommended image3
Nashik Kumbh: कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार, हे सरकार फार काळ टिकणार नाही; राऊतांचा मोठा दावा
Recommended image4
Maratha Reservation: ५८ लाख नोंदींचा मुद्दा पुन्हा पेटला; जरांगे पाटील आजपासून उपोषणावर
Recommended image5
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला; पण राज्यातील या 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Related Stories
Recommended image1
Ration Card: रेशन कार्ड बंद पडलंय? टेन्शन सोडा! आता घरबसल्या मोबाईलवर करा 'चुटकीसरशी' सुरू; जाणून घ्या सोपी प्रोसेस
Recommended image2
शेतकऱ्यांचे नशीब फळफळणार! पशुपालन व्यवसायासाठी सरकार देतंय ३० लाखांपर्यंत मदत; 'असा' घ्या या योजनेचा लाभ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved