'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली

| Published : May 22 2024, 06:42 PM IST

pune vande mataram organisation protests

सार

पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयात आणले असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

पुणे : पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयात आणले असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. 'वंदे मातरम..., विशाल अग्रवाल मुर्दाबाद', अशा घोषणा देत 'वंदे मातरम संघटने'तर्फे अग्रवाल विरोधात निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवालला मंगळवारी संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आरोपीवर शाई पडली नाही. पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोर्ट परिसरात जोरदार घोषणाबाजी करत आरोपी विशाल अग्रवालवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलाच्या कारच्या धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. अपघातानंतर अवघ्या पंधरा तासांत अल्पवयीन मुलाला सशर्त जामीन मिळाला. या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले आहेत.