- Home
- Maharashtra
- Pune Train Update : पुणेकरांसाठी मोठी बातमी! दौंड–मनमाड मार्गावर पॉवरब्लॉक; 30 पेक्षा जास्त गाड्या रद्द
Pune Train Update : पुणेकरांसाठी मोठी बातमी! दौंड–मनमाड मार्गावर पॉवरब्लॉक; 30 पेक्षा जास्त गाड्या रद्द
Pune Train Update : दौंड–मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने 4 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान मोठा पॉवरब्लॉक जाहीर केला. यामुळे पुणे विभागातील 30 हून अधिक गाड्या रद्द झाल्या केल्या आहेत.

पुणेकरांसाठी मोठी बातमी!
पुणे : पुणे विभागातील रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठी अडचण उद्भवणार आहे. दौंड–मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने 4 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत मोठा पॉवरब्लॉक जाहीर केला आहे. प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग या महत्त्वाच्या तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
यामुळे पुणे विभागातून धावणाऱ्या 30 हून अधिक गाड्या रद्द, तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
सोलापूर आणि विदर्भ मार्गावर मोठा परिणाम
या तांत्रिक ब्लॉकेजचा सर्वात मोठा फटका सोलापूर आणि विदर्भाकडे जाणाऱ्या गाड्यांना बसणार आहे.
15 ते 25 जानेवारी दरम्यान पूर्णपणे रद्द होणाऱ्या गाड्या
12169/12170 पुणे–सोलापूर एक्स्प्रेस
12157/12158 पुणे–सोलापूर एक्स्प्रेस
11418 सोलापूर–पुणे डेमू
पुणे–दौंड डेमू (अनेक फेऱ्या)
पुणे–बारामती डेमू
याशिवाय, विदर्भाकडे जाणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्याही साधारण 10 दिवसांसाठी रद्द राहणार आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब आणि मार्गबदल
रद्द गाड्यांव्यतिरिक्त अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशिराचा मोठा फटका बसणार आहे.
दीड ते अडीच तास उशिरा धावणाऱ्या गाड्या (4 ते 23 जानेवारी)
पुणे–अमरावती एक्स्प्रेस
पुणे–हटिया एक्स्प्रेस
पुणे–लखनऊ एक्स्प्रेस
पुणे–जबलपूर एक्स्प्रेस
पुणे–गोरखपूर, आझाद हिंद, पुणे–हावडा इत्यादी गाड्यांच्याही वेळापत्रकात बदल होणार आहे.
काही गाड्यांसाठी थांब्यात बदल, दौंडऐवजी खडकीत उतरावे लागेल
प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी, रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांचे समाप्ती स्थानक तात्पुरते बदलले आहे.
खालील गाड्या दौंडऐवजी खडकी स्थानकावर थांबणार अथवा तेथेच समाप्त होतील.
22944 इंदूर–दौंड एक्स्प्रेस
22194 ग्वाल्हेर–दौंड एक्स्प्रेस
तसेच काही गाड्यांचा प्रवास खडकीहून सुरू होणार असून, प्रवाशांनी प्रवासापुर्वी वेळापत्रक तपासणे अत्यावश्यक आहे.
प्रवाशांना आवाहन
रेल्वे विभागाने सर्व प्रवाशांना स्पष्ट सूचना दिली आहे.
“प्रवास करण्यापूर्वी तुमच्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि मार्ग नक्की तपासा.”
या कालावधीत तांत्रिक कामामुळे काही गाड्या रद्द, काहींच्या वेळांत बदल आणि काहींच्या थांब्यात फेरबदल झाल्यामुळे प्रवासाचे नियोजन आधीच करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

