बुधवार, २१ जानेवारीला बजाज पुणे ग्रँड टूर' या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळे पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहतील. वाहतूक पोलिसांनी बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्गांची सविस्तर माहिती जाहीर केली.

पुणे : पुणे शहरातील नागरिकांसाठी वाहतुकीबाबत महत्त्वाची सूचना आहे. बुधवार, 21 जानेवारी रोजी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन प्रवास करणाऱ्यांनी तसेच वाहनचालकांनी आधीच नियोजन करणे गरजेचे आहे. जर शक्य असेल तर वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, अन्यथा नेहमीपेक्षा लवकर घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

कधी आणि का बदल होणार?

बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची सुरुवात लेडीज क्लब परिसरातून होणार असून, मार्गावरील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील खासगी व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी त्यांच्या X (Twitter) अकाऊंटवरून बंद रस्ते आणि पर्यायी मार्गांची सविस्तर माहिती दिली आहे.

बंद राहणारे प्रमुख मार्ग व पर्यायी व्यवस्था

लेडीज क्लब ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक

ब्लू नाईट हॉटेल परिसर ते आंबेडकर पुतळा चौक हा मार्ग बंद

पर्यायी मार्ग: कोयाजी रोड – एम. जी. रोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते गोळीबार मैदान चौक

आंबेडकर चौक – खाण्या मारुती चौक (एम. जी. रोड) – सोलापुर बाजार चौकी (नेपियर रोड) – गोळीबार मैदान चौक

भैरोबा नाला, लुल्लानगर, गंगाधाम चौक मार्गे येणारी वाहतूक बंद

पर्यायी मार्ग: सेव्हन लव्हज चौक – वखार महामंडळ – गंगाधाम चौक

गोळीबार मैदान चौक ते शीतल पेट्रोल पंप

गोळीबार मैदान – लुल्लानगर – ज्योती हॉटेल – शीतल पेट्रोल पंप मार्ग बंद

पर्यायी मार्ग

मंम्मादेवी चौक – भैरोबानाला – गंगाधाम – सेव्हन लव्हज

शीतल पेट्रोल पंप – गंगा सॅटेलाईट – कौसरबाग – नेताजी नगर

सेव्हन लव्हज – गंगाधाम – लुल्लानगर (ब्रिजखालून)

शीतल पेट्रोल पंप ते खडीमशिन चौक

हा मार्ग पूर्णपणे बंद

पर्यायी मार्ग

कान्हा हॉटेल / मिठानगर – गंगाधाम – लुल्लानगर

मंतरवाडी – कान्हा हॉटेल – गंगाधाम

आश्रम रोड – एनआयबीएम – गंगा सॅटेलाईट – नेताजी नगर

खडीमशिन चौक ते ट्रिनिटी कॉलेज – बोपदेव घाट

हा मार्गही बंद

पर्यायी मार्ग

श्रीराम चौक – येवलेवाडी

धर्मावत पेट्रोल पंप – येवलेवाडी

हडपसर – सासवड – बोपदेव घाट

कात्रज – शिंदेवाडी – बोपदेव घाट

खडकवासला ते किरकीटवाडी

खडकवासला – सिंहगड रोड – किरकीटवाडी बंद

पर्यायी मार्ग: पानशेत रोड

वारजे ब्रिज ते नांदेड सिटी

हा मार्ग पूर्णपणे बंद

पर्यायी मार्ग उपलब्ध नाही

स्पर्धेबाबत थोडक्यात

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही 109.15 किमी अंतराची सायकल स्पर्धा असून, ती केवळ पुण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमधूनही स्पर्धक पुण्यात सहभागी होणार आहेत. वाहतुकीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी नागरिकांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांचे X अकाऊंट पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.