MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी; डब्यांची संख्या वाढणार का?

सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी; डब्यांची संख्या वाढणार का?

Pune-Mumbai Railway Update: सिंहगड एक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. या समस्येमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे डबे वाढवण्यासह विविध मागण्या केल्या.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 15 2026, 06:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी
Image Credit : Asianet News

सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी

Pune-Mumbai Railway Update: पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणजे 'सिंहगड एक्स्प्रेस'. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गाडीतील गर्दीने उच्चांक गाठला असून प्रवाशांना, विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
काय आहे नेमकी समस्या?
Image Credit : ANI

काय आहे नेमकी समस्या?

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये दररोज हजारो चाकरमानी आणि विद्यार्थी प्रवास करतात. मात्र, डब्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

डब्यांची घटलेली संख्या: कोरोना काळापूर्वी सिंहगड एक्स्प्रेसला १९ डबे होते, जे आता केवळ १४ वर आले आहेत.

जनरल डब्यांची कमतरता: सध्या केवळ एकच जनरल डबा उपलब्ध असल्याने प्रवाशांना उभे राहायलाही जागा मिळत नाहीये.

पासधारक विरुद्ध तिकीटधारक: जागा मिळत नसल्याने सामान्य तिकीटधारक प्रवासी 'मासिक पास' (MST) धारकांच्या डब्यात शिरतात, ज्यामुळे दररोज वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. 

Related Articles

Related image1
रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; आता सामान्य प्रवाशांचा प्रवास होणार 'हायटेक' आणि स्वच्छ
Related image2
गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
34
तरुणी आणि महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात
Image Credit : South Western Railways - SWR

तरुणी आणि महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात

प्रवासात होणाऱ्या या गर्दीचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसत आहे. राखीव डब्यात होणाऱ्या घुसखोरीमुळे महिलांना प्रवास करणे असुरक्षित वाटत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. 

44
प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या
Image Credit : our own

प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या

रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

स्वतंत्र महिला डबा: मासिक पासधारक महिलांसाठी राखीव डब्याची स्वतंत्र सोय करावी.

डब्यांची संख्या वाढवा: गाडीला पूर्वीप्रमाणेच किमान ३ जनरल डबे पुन्हा जोडण्यात यावेत.

कठोर तिकीट तपासणी: डेक्कन क्वीन, प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेसमध्ये नियमितपणे तिकीट तपासणीची मोहीम राबवावी.

प्रवासी संघटनेने यासाठी सह्यांची मोहीम देखील राबवली असून, आता रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Sangli Tragedy : देवदर्शनासाठी जमलेल्या भाविकांवर काळाचा घाला, भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू
Recommended image2
Nashik TCS Case : निदा खानला आश्रय देणं भोवलं, AIMIM नगरसेवकाच्या मालमत्तेवर पालिकेचा बुलडोझर
Recommended image3
Baramati Plane Crash : अजितदादांच्या अपघातग्रस्त गावाजवळ पुन्हा विमान कोसळलं; बारामतीत थरार, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
Recommended image4
राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी खांदेपालट! प्रफुल्ल पटेल यांचं नाव गायब, जय-पार्थ पवारांना मोठी जबाबदारी
Recommended image5
लाडक्या बहिणींना बसला मोठा धक्का, या महिलांचे १,५०० रुपये होणार बंद
Related Stories
Recommended image1
रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; आता सामान्य प्रवाशांचा प्रवास होणार 'हायटेक' आणि स्वच्छ
Recommended image2
गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved