एका अपक्ष आमदाराने मंत्र्यांवर गंभीर आरोप केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आमदार मंत्र्यांना 'चोर साला' असे म्हणताना ऐकू येत आहेत. आमदारांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की त्यांचा संताप हा मंत्र्यांवर नसून अधिकाऱ्यांवर होता.

सध्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता तर मंत्री आणि सत्ताधारी आमदार यांनी बोलण्याचा धडाका लावला आहे. एका अपक्ष आमदाराने मंत्री महोदयांच्या विरुद्ध बोलल्याचं एका व्हिडिओमधून दिसून आलं आहे. खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, चोर साला, तो म्हणजे निव्वळ....अशा शब्दांमध्ये कडवी टीका केली आहे.

सरकारी कार्यालयातील व्हिडीओ आला समोर 

सरकारी कार्यालयातील व्हिडिओमध्ये अपक्ष आमदार शरद सोनवणे हे आदिवासी मंत्र्यांच्या विरोधात टीका करताना दिसून आली आहे. आमदार सोनवणे यांनी अपशब्द वापरले असून त्यांनी याबद्दलच स्पष्टीकरण दिल आहे.

काय स्पष्टीकरण दिलं? 

या बैठकीत आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या घोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी देसाईंची मी झाडाझडती घेतली. ते समाजाच्या हिताचे काम करत नाहीत, त्यांच्याविरोधात माझ्या खूप तक्रारी आलेल्या आहेत. या देसाईंना गोरगरिबांचे काही पडलेलं नाही, असं असताना देसाई मंत्र्यांच्या मात्र पुढं-पुढं करतो. त्यामुळे, मी देसाईंवर संतापलो. त्याचं देसाईंना मी संबंधित खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसमोर उभं करुन, झाडाझडती घेणार, असं मी म्हणालो असं स्पष्टीकरण आमदार सोनवणे यांनी दिलं आहे.

मंत्र्यांना उद्देशून काय म्हटले? - 

आपल्याकडे असलेल्या व्हिडीओमधील संताप हा मंत्र्यांबद्दल नव्हे तर अधिकाऱ्याला उद्देशून असल्याचं सोनवणेंचं म्हणणं आहे. त्यांनी मंत्र्यांबद्दलच्या बोलण्यावर स्पष्टीकरण दिल आहे. आमदार सोनवणे यांनी तरी एखाद्या लोकप्रतिनिधीने अधिकाऱ्यांबद्दल अशी खालच्या पातळीची भाषा वापरावी का? अन् मुळात हा अधिकार सोनवणेंना घटनेने दिलाय का? हा खरा प्रश्न आहे. आता, त्यामुळे अडचणीत आलेल्या सोनवणेंनी केलेला हा खुलासा आणि व्हिडीओमधील संवाद हा नेमका मंत्र्यांच्या की अधिकाऱ्याबद्दल आहे, हे ज्याचं त्यानं समजून जावं.