Pune Ketan Agarwal : केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. सध्या पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर आता सियाच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. 

Pune Ketan Agarwal :  लोहगडावरुन खाली पडल्याच्या केतन अग्रवालच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. केतनचा अपघाती मृत्यू नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा पहिला धक्कादायक खुलासा झाला. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र अधिक वेगाने फिरवली असता यामध्ये आरोपी सिया आणि चेतन चौधरी असल्याचे समोर आले. सध्या आरोपींची अधिक चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. यातच ताज्या माहितीनुसार, केतन अग्रवालच्या खूनचा प्रयत्न खूप आधीच करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. याशिवाय सियाच्या आई-वडिलांचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

YouTube video player

केतनच्या खूनाचा वारंवार प्रयत्न

केतन अग्रवालच्या खूनचा प्लॅन सिया आणि चेतन चौधरी यांच्याकडून आधीपासून सुरू होता. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, 31 मे, 1 जून, 14 जूनला केतन अग्रवाल याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पण हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. यामुळे चेतन चौधरी संतप्त झाला होता. अशाप्रकारे केतनला मारण्यासाठी तीन वेळा प्रयत्न झाला. अखेर 18 जूनला केतनच्या हत्येचा कट यशस्वी झाला.

YouTube video player

31 मे रोजी हत्येचा कट

संतप्त झालेल्या चेतन चौधरीने सियाला "तुमसे न हो पाएगा, मै आता हूं अब मारने" असेही म्हटले. वारंवार केतनच्या हत्येचा प्रयत्न फसत असल्याने या प्रकरणात चेतन चौधरीने उडी मारली. 31 मे ला लोहगडावर ट्रेकिंगच्या बहाण्याने केतनच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता असे समोर आले आहे. या दोघांनी मिळून एका कॅफेमध्ये केतनच्या हत्येचा कट रचल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.

YouTube video player

दोषी ठरल्यास मुलीला शिक्षा द्या

सिया गोयलच्या आई-वडिलांनी या प्रकरणात मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, आमची मुलगी दोषी ठरल्यास तिला कठोर शिक्षा व्हावी. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी म्हटले की, "ज्याने कोणी केतनची हत्या केलीय त्याला शिक्षा व्हावी. माझी मुलगी दोषी असल्यास तिलाही गडावरुन खाली ढकलून द्यावे." तर सियाच्या आईने म्हटले की, " आम्हाला कधीच सियाकडून ती लग्नासाठी नाखूश असल्याचे संकेत मिळाले नाहीत."

दुसऱ्या बाजूला चेतन चौधरीच्या घरातील मंडळींनी त्याची बाजू घेत बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. चेतनच्या परिवाराने म्हटले की, त्याला या प्रकरणात अडकवेल जात आहे.