- Home
- Maharashtra
- रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! आता थेट हडपसर स्टेशनवरून धावतील दोन गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! आता थेट हडपसर स्टेशनवरून धावतील दोन गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक
Pune Station Train Schedule Changes: पुणे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २६ जानेवारीपासून २ महत्त्वाच्या गाड्या हडपसर टर्मिनलवरून सोडण्याचा निर्णय घेतला. हडपसर टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे पुणे स्टेशनवरील ताण कमी होणारय

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट!
पुणे: पुणे स्थानकावरील वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 26 जानेवारीपासून पुण्यातून चालणाऱ्या दोन महत्त्वाच्या गाड्या थेट हडपसर टर्मिनलवरून सुटणार असून, प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.
हडपसर टर्मिनल तयार, पुणे स्टेशनवरील ताण होणार कमी
पुणे रेल्वे स्थानकाचा ताण कमी करण्यासाठी हडपसर टर्मिनलला पर्यायी पर्याय म्हणून विकसित केले जात आहे. येथे सध्या 90% कामे पूर्ण झाली असून, पुढील महिन्यात संपूर्ण टर्मिनल कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे स्टेशनवरील गाड्या टप्प्याटप्प्याने हडपसर आणि खडकी स्थानकांवर वळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून दोन गाड्या हडपसरहून धावायला सुरुवात करणार आहेत.
26 जानेवारीपासून हडपसरहून सुटणाऱ्या दोन गाड्या
रेल्वे प्रशासनानुसार खालील गाड्या आता पुणे स्थानकाऐवजी थेट हडपसर टर्मिनलवरून सुटतील.
17629/17630 हडपसर – हजूर साहिब नांदेड हडपसर एक्सप्रेस (दैनंदिन)
01487/01488 हडपसर – हरंगुळ दैनंदिन विशेष गाडी
प्रवाशांच्या सोयीसाठी हा बदल करण्यात आला असून, यामुळे पुणे स्थानकावरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
हडपसर टर्मिनलवरून 12 गाड्या सुटणार, 10 गाड्यांना थांबा
हडपसर टर्मिनल सुरू झाल्यानंतर येथे
12 नियमित आणि विशेष गाड्या सुटणार असून
10 गाड्यांना थांबा दिला जाणार आहे.
दरम्यान, पुणे स्थानकावरील रिमॉडेलिंग आणि विकासाच्या कामांमुळे काही गाड्या हडपसर आणि खडकीकडे वळवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी त्रास टळेल आणि वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.
प्रवाशांसाठी मोठा दिलासा
हडपसर टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर दररोज हजारो प्रवाशांना पर्यायी स्थानकाचा फायदा मिळणार आहे. पुणे स्थानकावरील ताण कमी होईल आणि गाड्यांची वेळपालनक्षमता (punctuality) वाढेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

