सार

बीडमधील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले भावूक झाले होते. यावेळी ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणणार आहे.

बीड : अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा (Beed Lok Sabha) निवडणुकीच्या मैदानात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यातच भाजप नेते उदयनराजे भोसले हे आज बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे. यावेळी उदयनराजे भोसले बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेत बोलताना भावूक झाल्याचं दिसलं. त्याचसोबत पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर झाले. पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देईन आणि साताऱ्यामधून त्यांना निवडून आणेन असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे ते आपल्या बहिणीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.