Girish Mahajan on Loksabha Election : उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा दावा

| Published : May 26 2024, 04:51 PM IST

girish mahajan
Girish Mahajan on Loksabha Election : उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहा जागा विजयी होतील, गिरीश महाजनांचा दावा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजय होतील. महायुतीच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून येतील", असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

घोडामैदान समोर आहे. जळगाव लोकसभेच्या जागेबाबतच्या बातम्या, निराधार गोष्टी आहेत. त्यामुळे आपण चार तारखेला भेटू. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभांमध्ये आमच्या उमेदवाराला सर्वात उच्चांकी आणि विक्रमी मत मिळतील. लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजय होतील. महायुतीच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून येतील", असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, आम्हाला देशात स्पष्ट बहुमत मिळेल

गिरीश महाजन म्हणाले, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आम्हाला देशात स्पष्ट बहुमत मिळेल. मोठ्या मतांनी आमचे खासदार देशात निवडून येतील व पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं ठरवला आहे. संजय राऊतांच्या नितीन गडकरींबाबतच्या दाव्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत यांचे डोकं तपासावा लागेल. आता तेवढेच राहिला आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल.