सार

शरद पवार आणि अजित पवार यांचे पाडव्याचे कार्यक्रम अनुक्रमे मोदीबाग आणि काटेवाडी येथे आयोजित करण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून, कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले आहेत.

राज्याच्या राजकारणात सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर वातावरण ढवळून निघाले आहे. आता संपूर्ण पवार कुटुंबियांचे दोन पाडवा कार्यक्रम साजरा केला जात आहे. शरद पवार यांच्या पाडव्याचा कार्यक्रम मोदीबाग आणि अजित पवार काटेवाडी येथे हे कार्यक्रम केले जात आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेत्यांची येथे या दोनही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली जात आहे. 

शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची झाली गर्दी - 
शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदीबाग येथे कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. वर्षातून एकदाच हा कार्यक्रम होत असल्यामुळे येथे राज्यभरातून तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत. येथे अतिशय तळागातील कार्यकर्ते भेटायला येणार असतात. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो. गेली 18 वर्षे मी शरद पवारांना भेटण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असं एका कार्यकर्त्याने म्हटलं आहे. 

काटेवाडीत अजित पवारांचा पाडवा कार्यक्रम साजरा होणार - 
काटेवाडीत अजित पवार यांचा पाडव्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. अजित पवार यांच्यासोबत आता पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे आता सोबत असल्याचं दिसून आला आहे.