महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मासिक ₹1500 देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेत वाढ होईल, असा सरकारचा दावा आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ समुदायांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय, जो महाराष्ट्रातील मनोज जरांगेंच्या पॅटर्नशी मिळता जुळताय. मिशिगनसारख्या स्विंग स्टेट्समध्ये ट्रम्प यांची ही रणनीती विजय मिळवून देऊ शकते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
बारामतीच्या दौऱ्यावर अजित पवार यांनी स्थानिकांना भावनिक आवाहन केले आहे. विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी आरोग्य क्षेत्रातील प्रगती आणि 'लाडकी बहीण' योजनेचा उल्लेख केला.
महाराष्ट्रातील 27 कॅबिनेट मंत्र्यांपैकी बहुतांश मंत्र्यांच्या आर्थिक स्थितीत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिती तटकरे, रवींद्र चव्हाण, संजय राठोड आणि संजय बनसोडे यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.
शिवसेना (UBT) नेते अरविंद सावंत यांच्या शायना एनसींवरील टिप्पणीवरून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, पंतप्रधान मोदी जिथे संकट असते तिथे राहत नाहीत, पण जिथे निवडणुका असतात तिथे राहतात.