पुणे जिल्ह्यातील वर्वंड गावातील शेतकरी सागर शिंदे यांनी जपानच्या प्रसिद्ध मियाझाकी आंब्याची यशस्वी लागवड केली आहे. 'एग ऑफ द सन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आंब्याला देश-विदेशातून मागणी वाढली.
पाकिस्तानी सिनेटर पलवाशा महंमद झई खान यांनी बाबरीची वीट पुन्हा ठेवण्याची भाषा केली केली. त्यावर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी तुमचा बाप हिंदुस्तानात बसला आहे, असे म्हटले आहे.
माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे पुण्यात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते आणि एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव होता.
मुंबईचा सागरी किनारा रस्ता प्रकल्पात मे महिन्यात आणखी तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. दक्षिण मुंबई ते दहिसर प्रवास जलद आणि सुलभ होणार असून, नरिमन पॉइंट ते वांद्रे-वरळी सी लिंक दरम्यान वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
भेंडवळ घटमांडणीच्या भविष्यवाणीनुसार यंदा पावसाळा भरभरून राहणार असला तरी अवकाळी पावसाचा धोकाही आहे. देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत राहणार असली तरी आर्थिक आव्हाने कायम राहतील. शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील.
एकनाथ शिंदे यांनी 'मिशन महापालिका' सुरू करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार हादरा दिला आहे. कोकणापासून ते मुंबईपर्यंत अनेक माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उष्माघात आणि अतिसाराचा त्रास झाल्याने त्यांचा बीडचा दौरा रद्द करण्यात आला.
कोकणातील शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या घरातील काम करणाऱ्या सुप्रिया पाटील हिच्या लग्नात भावनिक क्षण अनुभवले. 8 वर्षांपासून त्यांच्या घरी काम करणाऱ्या सुप्रियाला त्यांनी आपली मुलगी मानले असून तिच्या पाठवणीच्या वेळी जाधव कुटुंब भावूक झाले.
सुमारे 150 प्रवाशांसह, फ्लाइट IX-2714 ने संध्याकाळी 7:45 वाजता धावपट्टीवरून उड्डाण सुरू केले. विमानाचा एसी बंद असल्याने, केबिनमधील उष्णता वाढली आणि एका महिला प्रवाशाला चक्कर आली आणि ती जवळजवळ बेशुद्ध पडली.
१ मेला साजरा होणारा महाराष्ट्र दिन केवळ एक तारीख नसून मराठी अस्मिता, संस्कृती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढ्याचे प्रतीक आहे. या लढ्यातील हुतात्म्यांना आणि अज्ञात कार्यकर्त्यांना आदरांजली वाहून आजच्या प्रगतीशील महाराष्ट्राचा हा गौरवशाली प्रवास आहे.
Maharashtra