नागपुरात जगातील सर्वात मोठा पडदा असलेले चित्रपटगृह उभारण्यात येणार आहे. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकार होणार असून, भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याचे ध्येय यामागे आहे.