Kolhapur News : कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील तलावार मित्रासोबत बोटिंग करणे जीवावर बेतले आहे. यामध्ये 31 वर्षीय जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Maharashtra : गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथील तलावात मित्रासोबत बोटिंग करायला गेलेल्या एका जिम प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटना 1 मे रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. सचिन संभाजी जगदाळे असे तरुणाचे नाव होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सचिन शिरोलीमधील जिम प्रशिक्षक म्हणून काम करायचा. तीन मित्रांसोबत अणदूर येथील तलावाजवळ फिरायला आले होते. येथेच असणाऱ्या फार्म हाउसच्या बाजूला रिकामी बोट होती. या बोटीच्या मदतीने चारही जण तलावात उतरले असता बोट खोल पाण्यापर्यंत पोहोचली गेली. त्यावेळी बोट अचानक उलटली गेली. त्यामध्ये तिघांनी पोहच आपला जीव वाचवला. पण जिम प्रशिक्षकाचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर आठ तास शोध घेतल्यानंतर सचिनचा मृतदेह खोल तलावातून बाहेर काढण्यात आला. यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांना दिला गेला.