अकोल्यातील तार फाईल परिसरात एका पतीने पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुहेरी हत्येने परिसरात शोककळा पसरली आहे.
पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, ५० लाखांची खंडणी मागितली, जबरदस्तीने लग्न लावले आणि नग्न फोटो वडिलांना पाठवण्याची धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीच्या दिवशी पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली. या अपघातात 19 जण जखमी झाले असून सात जण देखील गंभीर जखमी झालेत.
Maharashtra : जळगावमध्ये तिघांवर मध्यरात्री तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळीचे वातावरण आहे.
१० मे २०२५ पासून शहरातील पेट्रोल पंपांवर युपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड अशा सर्व डिजिटल पेमेंट्स स्वीकारणं बंद केलं जाणार असल्याचा इशारा पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे.
Maharashtra : नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात 3 हजार वर्षे जुनी लोहयुगीन संस्कृती शोधून काढली आहे. पाचखेड गावातील उत्खननात सातवाहन, मध्ययुगीन आणि निजाम युगासह विविध सांस्कृतिक कालखंडांसह बहुस्तरीय वस्ती आढळून आली.
ठाण्यातील तीन पोलिसांनी एका जोडप्याकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर तिघांनाही निलंबित करण्यात आले असून, सिसिटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डिंगमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
गोकुळ दूध उत्पादक संघाने ४ मेपासून दुधाच्या दरात वाढ केली आहे. फुल क्रीम दूध ₹७४ प्रती लिटर आणि गाय दूध ₹५८ प्रती लिटर असे नवे दर असतील. महागाई आणि उत्पादन खर्चातील वाढ हे दरवाढीचे कारण सांगण्यात येत आहे.
Maharashtra Accident : वडगाव उड्डाणपूलाजवळील परिसरात 24 तासात तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीच्या धडकेमध्ये दुचाकीवरुन येणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.
नागपुरात जगातील सर्वात मोठा पडदा असलेले चित्रपटगृह उभारण्यात येणार आहे. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकार होणार असून, भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याचे ध्येय यामागे आहे.
Maharashtra