Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी असावरी जगदाळे यांनी सरकार आणि भारतीय सैन्याने घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
मे महिन्यात मुंबई आणि आसपासच्या भागात कोसळलेल्या अवकाळी पावसाने वाहतूक, वीज आणि दळणवळण व्यवस्थेवर मोठा परिणाम केला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने धावत असून, अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे.
मध्य रेल्वेने मुंबईतील CSMT स्थानकावर एका समन्वित मॉक ड्रिलचे आयोजन केले, ज्यामध्ये RPF, GRP, MSF आणि होम गार्ड्ससह 100 हून अधिक सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक ट्रेन आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चित्रपट निर्मिती, आदिशक्ती अभियान, यशवंत विद्यार्थी योजना, वसतिगृह योजना आदी निर्णय घेण्यात आले. बघा या बैठकीचा फोटो अल्बम….
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली असून, भाजपाने त्यांच्या पक्षाला दुय्यम वागणूक दिल्याची नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे-पवार सरकार आल्यानंतर लहान पक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर टीका करत मराठा समाजाच्या नुकसानाला त्यांना जबाबदार ठरवलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त करताना भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ११ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये चित्रपट निर्मिती, आदिशक्ती अभियान, यशवंत विद्यार्थी योजना, वसतिगृह योजना आदी योजनांचा समावेश आहे.
कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचं रविवारी, वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी आपलं आयुष्य कामगारांच्या उन्नतीसाठी समर्पित केलं आणि अण्णाभाऊंच्या विचारांची ज्योत जिवंत ठेवली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली. काही अपवाद वगळता सर्वत्र युती राहणार असून, ओबीसी आरक्षणाबाबतही त्यांनी भाष्य केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या 57 व्या राज्यव्यापी अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. मंत्री भरत गोगावलेंच्या '२ चपटी प्या' या विधानाने वाद निर्माण झाला, तर महिला कर्मचाऱ्यांना रात्री 8 नंतर ड्युटी न लावण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली.
Maharashtra