वर्धा जिल्ह्यातील ६८ वर्षीय इंदू सातपुते यांनी आपल्या नातवासोबत दहावीची परीक्षा ५१% गुणांसह उत्तीर्ण केली आहे. शिक्षणाची संधी न मिळालेल्या इंदू सातपुते यांनी 'सेकंड चान्स' उपक्रमाद्वारे शिक्षण पुन्हा सुरू केले आणि यश मिळवले.
पुण्यातील दत्तवाडी येथील एका व्हिडिओने पुणेकरांची झोप उडाली आहे. यात काही तरुण हातात कोयता नाचवत एका तरुणावर हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेत हा तरुण जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, कोयता गॅंगवर अंकूश आणण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.
येत्या 9 जूनपासून विशेष पर्यटन ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
हिंदू विराट सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू मुलींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच त्यांच्या सभेल लॉरेन्स बिष्णोईचे फोटोही झळकले आहे.
पुणे जिल्ह्यात एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. ती नाईट शिफ्टला जात असताना हा प्रकार घडला. त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र सरकारने देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्काळ बंदी घातली आहे. नवीन धोरण येईपर्यंत सर्व व्यवहार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, केवळ न्यायालयीन आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनींचेच दस्त स्वीकारले जातील.
सोलापूर जिल्ह्यातील वरकुटे गावाजवळ वडिलांच्या अंत्यविधीनंतर परतणाऱ्या ३५ वर्षीय हर्षद झंकर यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली आणि भारतीय सशस्त्र दलांना मानवंदना दिली.
मुंबईच्या ६५ वर्षीय प्रभादेवी जाधव आणि त्यांच्या नातू सोहम जाधव यांनी एकत्र दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. प्रभादेवी यांनी ५२% तर सोहमने ८२% गुण मिळवले.
बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडून पुणे विमानतळावर तब्बल १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
Maharashtra