मुंबईच्या ६५ वर्षीय प्रभादेवी जाधव आणि त्यांच्या नातू सोहम जाधव यांनी एकत्र दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. प्रभादेवी यांनी ५२% तर सोहमने ८२% गुण मिळवले.

मुंबई: शिक्षणासाठी वयाची अट नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय मुंबईच्या ६५ वर्षीय प्रभादेवी जाधव आणि त्यांच्या नातू सोहम जाधवने. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदाचा निकाल ९४.१०% टक्के लागला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये एक असामान्य जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आजी आणि नातवाची!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Scroll to load tweet…

एकत्र अभ्यास, एकत्र परीक्षा, एकत्र यश!

मुंबईतील जाधव कुटुंबातील ही अनोखी जोडी यंदाच्या निकालात सर्वांची कौतुकाची धनी ठरली.

प्रभादेवी जाधव – वयाच्या ६५व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली आणि मिळवले ५२% गुण

सोहम जाधव – आजीच्या जोडीनेच परीक्षा देऊन मिळवले ८२% गुण

आजीनं आनंद व्यक्त करत सांगितलं, "लग्नानंतर शिक्षण अर्धवट राहिलं. पण नातवाला शिकताना पाहून प्रेरणा मिळाली. मी मराठी मीडियममधून परीक्षा दिली, तर सोहम इंग्रजी मीडियममधून. परीक्षा केंद्रावर सर्वांनी मदत केली, उभारी दिली."

राज्यभरात यंदाच्या निकालाची झलक:

परीक्षेस नोंदणीकृत विद्यार्थी: १५,५८,०२०

परीक्षा दिलेले विद्यार्थी: १५,४६,५७९

उत्तीर्ण विद्यार्थी: १४,५५,४३३

प्राविण्य श्रेणीतील विद्यार्थी: ४,८८,७४५

प्रथम श्रेणीतील विद्यार्थी: ४,९७,२७७

कोकण विभागाने यंदाही सर्वाधिक निकाल देत ‘नंबर वन’चा किताब कायम ठेवला आहे.

आजीनं दिला लाखमोलाचा संदेश:

"वय काहीही असो, शिकायचं कधीही उशीर नाही. इच्छा असेल, जिद्द असेल तर यश नक्कीच मिळतं," असा सकारात्मक संदेश प्रभादेवी जाधव यांनी दिला आहे. त्यांच्या या यशाने अनेक महिलांना आणि वयस्क नागरिकांना शिक्षणासाठी नवी प्रेरणा दिली आहे.