सोलापूर जिल्ह्यातील वरकुटे गावाजवळ वडिलांच्या अंत्यविधीनंतर परतणाऱ्या ३५ वर्षीय हर्षद झंकर यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली आणि भारतीय सशस्त्र दलांना मानवंदना दिली.
मुंबईच्या ६५ वर्षीय प्रभादेवी जाधव आणि त्यांच्या नातू सोहम जाधव यांनी एकत्र दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. प्रभादेवी यांनी ५२% तर सोहमने ८२% गुण मिळवले.
बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडून पुणे विमानतळावर तब्बल १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका १७ वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली. आई-वडील कामावर असताना तिने घरी गळफास घेतला. ही घटना शिक्षण व्यवस्थेतील मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षित बाजूवर प्रकाश टाकते.
डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या हेमंत जोशींना पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमवावा लागला. यामुळे संपूर्ण कुंटुबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला.
मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गुन्हा नोंदवण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
कात्रज डेअरीने १२ मे २०२५ पासून दूध दरात ₹२ प्रति लिटर वाढ केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ घेतली.
निवृत्तीच्या आठवड्यानंतर रोहितने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.
Maharashtra