महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता असून, पुढील चार आठवड्यांसाठी हवामान खात्याने इशारा दिला आहे. ३१ मेपर्यंत मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार यांच्या नावाने स्टॅण्डचे नामकरण करण्यात आले. मात्र, पवारांनी या सन्मानाबद्दल नम्रता व्यक्त करत, स्टेडियम उभारणीतील सर्वांचे योगदान अधोरेखित केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
बीड जिल्ह्यातील केज शहरात भरधाव कंटेनरने 8-10 वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने कंटेनरला आग लावली.
नागपूर येथील महिला आणि तिची मुलगा लडाखला फिरायला गेले होते. या दरम्यान दोघे बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गुप्तचर संस्थाही या कामी मदत करत आहेत.
महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर गुरुवारी नागपुरात आयोजित 'तिरंगा यात्रा' चे नेतृत्व केले. १६ ते २० मे दरम्यान महाराष्ट्रात १५०० हून अधिक 'तिरंगा रॅली' आयोजित केल्या जातील.
पुण्यात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कौटुंबिक ताणतणाव पुढे आला आहे.
मुठा नदीवरील केबल स्टेड ब्रिज मे महिन्याच्या अखेरीस खुला करण्याची योजना पुणे मेट्रोने आखली आहे. त्यानंतर पुणे करांना मेट्रो स्टेशनवर जाणे अधिक सोईचे होणार आहे. त्यानंतर पुणेकरांचा वेळही वाचणार आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी १५ मे २०२५ रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
शहापूर तालुक्यातील फुगाळे गावात एक ड्रोन डोंगरावर कोसळला. खेळणाऱ्या मुलांना ड्रोन सापडल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक तपासात हा ड्रोन जलसंपदा विभागाच्या सर्वेक्षणासाठी वापरला जात असल्याचे समोर आले.
येत्या 9 जूनपासून विशेष पर्यटन ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून नागरिकांना ऐतिहासिक किल्ले आणि धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.
Maharashtra