सोलापूरच्या एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात रविवारी पहाटे भीषण आग लागून ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये कारखान्याचे मालक, त्यांचे कुटुंबीय आणि कामगारांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे भुईमुगाचे पीक वाहून गेले. या शेतकऱ्याला केंद्रीय मंत्र्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या जात आहेत. याशिवाय बहिरट आठवड्याभरात अजित पवारांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मुंबईहून देवरुखला जाणाऱ्या कुटुंबाची कार १०० फूट खोल नदीपात्रात कोसळली. चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्री सायन-पनवेल महामार्गावर भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजू शेट्टी यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सनातन राष्ट्र शंखनाद मोहोत्सवाच्या उद्घाटनावेळी गोव्याबद्दल विधान केले. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, गोवा ही मजा करण्याची नव्हे तर भक्ती आणि योगाची भूमी आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते वसंत मोरे दररोज संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे पारायण करणार आहेत. मोरे यांनी हे पुस्तक त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात ठेवले असून ते लढण्याची प्रेरणा देत असल्याचे म्हटले आहे.
जळगावच्या शिवसेना कार्यालयात भूताचा वावर असल्याच्या अफवांवर जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'हे भूत नाही, तर अफवांचे भूत आहे,' असे म्हणत त्यांनी या चर्चांना फेटाळून लावले आणि राजकीय विरोधकांवर टीका केली.
पुण्यातील भुकरवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. लग्नानंतर हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
Maharashtra