नारायण राणे यांनी माहीममधील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचारासाठी पाठिंबा जाहीर केल्याने राज ठाकरेंसाठी धक्का मानला जातो. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंच्या उमेदवारीची अपेक्षा असताना, सरवणकरांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय वातावरण तापलेय.
पंतप्रधान मोदींनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अरविंद सावंत यांनी शाइना एनसी यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल विरोधी आघाडी INDIA वर निशाणा साधला.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चौरंगी लढत निर्माण झाली आहे. चांदवडमध्ये केदा आहेर यांच्या बंडखोरीमुळे तिरंगी लढत होणार आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल राजकीय समीकरणे बदलू शकतात.
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये शिर्डी आणि श्रीरामपूरमध्ये तिरंगी लढती होणार आहेत. राजेंद्र पिपाडा यांच्या बंडखोरीमुळे शिर्डीत भाजपला धक्का बसला असून, श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे यांनीही बंडखोरी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अनेक बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे महायुती, महाविकास आघाडीच्या रणनीतीत मोठा बदल झाला आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानात याचा कसा परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता २८८ जागांसाठी ८२७२ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १०९०० अर्ज दाखल झाले होते.